बिश्केक : वृत्तसंस्था
किर्गिजस्तान हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. किर्गिजस्तानमध्ये महिलांच्या बुरखा, हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. बुरखा-हिजाबच्या आड दहशतवादी लपलेले असू शकतात, असा किर्गिजस्तान सरकारचा दावा आहे. म्हणून महिलांनी हिजाब घालून रस्त्यावर चालू नये असा किर्गिजस्तान सरकारने निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद केली आहे.
किर्गिजस्तानमधील मुस्लिमांच्या अध्यात्मिक प्रशासनाने (मुफ्तयात) सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. महिला संपूर्ण शरीर झाकणारा नकाब किंवा बुरखा घालू शकत नाहीत, असे आदेशात म्हटले आहे. ज्या महिला संपूर्ण शरीर झाकून चालतात, त्या एलियन वाटतात असे मुफ्तीयातने म्हटले आहे; म्हणून महिलांनी फक्त चेहरा झाकून चालावे असे आम्हाला वाटते.
शरिया कायद्याचा हवाला देत मुफ्तीयतने म्हटले की, शरिया कायद्यात डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणे अनिवार्य केले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा निर्णयाविरोधात फतवा जारी होऊ शकत नाही. सर्व लोकांनी सरकारचा आदेश तात्काळ मान्य करावा. सरकारने सुरक्षा कारणांमुळे असा निर्णय घेतला आहे असे मुफ्तीयतने म्हटले आहे.
नियम मोडणा-यांना काय शिक्षा?
गुन्हेगार याचा दुरुपयोग करत आहेत. आम्ही याची उदाहरणे पाहिली आहेत. त्यानंतर बुरखा आणि हिजाबवर बंदी लावण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बुरखा, हिजाब बंदीचे उल्लंघन करणा-यांना तुरुंगवासाची शिक्षा तसेच २० हजार सोम (स्थानिक मुद्रा) दंड ठोठावण्याची तरतूद आहे.