बुमराहची उत्तम कामगिरी, इतर गोलंदाज निष्प्रभ
मेलबर्न : वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. चार कसोटी सामन्यानंतर भारत आता आस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव झाला. यामुळे भारताच्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचा मार्ग अधिक खडतर झाला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. मात्र, खराब फलंदाजी आणि काही चुकांमुळे भारताला १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत मालिकेत चांगली कामगिरी केली. मात्र, त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही. मेलबर्न कसोटीत त्यांने ९ विकेट घेतल्या.
आकडेवारीनुसार पाहिले असता जसप्रीत बुमराहने डब्ल्यूटीसीत चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीदेखील बुमराहची चांगली राहिली आहे. बुमराहच्या गोलंदाजीपुढे इतर सर्व फलंदाज फिके पडतात. बुमराहने डब्ल्यूटीसीच्या ३४ सामन्यात १५४ विकेट घेतल्या आहेत. त्याने १० डावात ५ विकेट घेतल्या आहेत.
बुमराहची कामगिरी?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ३४ सामन्यात बुमराहने १५४ विकेट घेतल्या. यापैकी १० डावात बुमराहने ५ विकेट घेण्याचे कौशल्य आहे. जाणकारांच्या दाव्यानुसार मेलबर्न कसोटीत त्याला सहका-यांची आवश्यक ती मदत मिळली नाही. इतरांनी गोलंदाजीत साथ दिली असता चित्र वेगळे असते. बुमराहने सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात ३० विकेट १२.८३ च्या सरासरीने घेतल्या आहेत. या व्यतिरिक्त बुमराहने ७ डावात ४ विकेट गोलंदाज म्हणून घेतल्या आहेत. जाणकारांच्या मते बुमराहाला इतरांचे सहकार्य मिळत नाही. बुमराहाला इतरांनी साथ दिली असती तर मालिकेचे चित्र वेगळे असते.