अलाहाबाद : वृत्तसंस्था
अलाहाबादमधील एका दाजी-मेहुणीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांच्यातील संबंध अनैतिक आहेत पण ते बलात्काराच्या श्रेणीत नाहीत, असे म्हणत दाजीला जामिन दिला आहे.
नात्याने ही तरुणी मेहुणी लागते. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप दाजीवर ठेवण्यात आला होता. यावर कोर्टाने दोघांतील प्रेम संबंध अनैतिक जरी असले तरी हा लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा होत नाही, असे म्हटले आहे.
आरोपी दाजीविरुद्ध भादंवि कलम ३६६, ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने आपल्या मेहुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि नंतर तिला पळवून नेल्याचा आरोप आहे. आरोपीने अलाहाबाद उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने भाष्य केले.
मुलगी प्रौढ आहे आणि तिचे प्रेमसंबंध होते, यावरही न्यायालयाने विचार केला. दाजीला जुलै २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्या आधारे न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला.