लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात ६ मे पासून पावसाला सुरुवात झाली. मे महिन्याची पावसाची लातूर जिल्ह्याती टक्केवारी १९.७ एवढी आहे. गेल्या १६ दिवसांत जिल्ह्यात ४१३.७ एवढा पाऊस पडला. हा पाऊस मे महिन्याच्या जिल्ह्याच्या सरासरीच्या टक्केवारीच्या चारशेपट आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत लातूर जिल्ह्यात ३०.४ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या १६ दिवसांपासून बेमोसमी पाऊस पडतो आहे. या १६ दिवसांत लातूर तालुक्यात ७६.२ मी. मी., औसा तालुक्यात ६६.६ मी. मी., अहमदपुर तालुक्यात २८.६मी. मी., निलंगा तालुक्यात ९२.६ मी. मी., उदगीर तालुक्यात १०४.२ मी. मी., चाकुर तालुक्यात ८०.४मी. मी., रेणापुर तालुक्यात ९२.४ मी. मी., देवणी तालुक्यात ९६.३ मी. मी., शिरुर अनंतपाळ तालुक्यात ९७.८ मी. मी., जळकोट तालुक्यात ७७.० मी. मी. पावसाची नोंंद झाली आहे.
मे चा अर्धा महिना कडक उन्हात गेला आणि अर्धा महिना उन्हाळ्याऐवजी पावसाळ्याचेच वातावरण तयार झाले आहे. दररोज पावसाची हजेरी राहत आहे. जिल्ह्यात दररोज कूठे ना कुठे पाऊस पडत राहिला. गेल्या चार दिवसांत पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापून टाकला आहे. काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी पावसाचा जोर चांगला आहे. मे महिन्यात एवढा मोठा आणि सलग पाऊस पहिल्यांदाच असा अनुभव आला आहे.
केवळ पाऊसच नव्हे तर विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट भयंकर परिस्थिती निर्माण करीत आहे. त्याच वादळी वा-याने धुमाकुळ घातला आहे. लातूर शहरास लातूर तालुका, औसा, निलंगा, उदगीर, जळाकोट, देवणी, अहमदपूर, चाकुर, शिरुर अनंतपाळ, रेणापूर या दहाही तालुक्यांत पावसाची हजेरी आहे. या पावसाने शेतीचे विशेषत: फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. वीज पडून मनुष्यांसह पशूंची जीवित हानी, शहरात घरावरी पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत.