मॉस्को : वृत्तसंस्था
रशियाच्या बालाशिखा शहरात शुक्रवारी झालेल्या कार बॉम्ब स्फोटात रशियन जनरल यारोस्लाव मोस्कलिक यांचा मृत्यू झाला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे खास सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्याच दिवशी ही घटना घडली. लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कालिक ते रशियन सैन्याच्या जनरल स्टाफच्या मुख्य ऑपरेशन्स डायरेक्टोरेटचे उपप्रमुख होते. स्फोटात वापरलेली कार फोक्सवॅगन गोल्फ होती. रशियन तपास समितीने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि म्हटले आहे की, हा स्फोट रिमोट बॉम्बने घडवला गेला. तो एका उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यात आला होता. हा स्फोट तीक्ष्ण धातूच्या तुकड्यांनी भरलेल्या आयईडीमुळे झाला, असेही यावेळी सांगण्यात आले.
हा हल्ला रशियन अधिका-यांच्या मागील हत्येसारखाच होता, ज्यामध्ये युक्रेनमधील युद्धभूमीवर रासायनिक शस्त्रांचा वापर घडवून आणल्याचा आरोप असलेल्या रशियन जनरल लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांचाही समावेश आहे. डिसेंबरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवलेल्या रिमोटली ऑपरेटेड बॉम्बच्या स्फोटात रशियाच्या रेडिओलॉजिकल, बायोलॉजिकल आणि केमिकल प्रोटेक्शन फोर्सेसचे प्रमुख असलेले किरिलोव्ह यांची हत्या झाली होती.