26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र‘मोक्का’ कारवाईनंतर फरार झालेले चोरटे गजाआड

‘मोक्का’ कारवाईनंतर फरार झालेले चोरटे गजाआड

हडपसर परिसरात सापळा लावून पकडले

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळया भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेने हडपसर भागातून अटक केली आहे.

भादा आणि भोंद हे सराईत चोरटे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिघी पोलिस ठाण्याकडून गेल्या वर्षी भादा, भोंड आणि साथीदारांविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून भादा आणि भोंड पसार झाले होते.

दोघे हडपसर भागातील वैभव चित्रपटगृहाजवळ थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलिस कर्मचारी कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. पोलिस निरीक्षक छगन कापसे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे यांनी ही कारवाई केली.

धर्मनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (वय २२), बादशहासिंग फौलादसिंग भोंड (वय २३, दोघे रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR