23.4 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमुख्य बातम्यामोदींच्या उत्तराधिका-याच्या प्रस्तावावर कुंभमेळ्यात चर्चा

मोदींच्या उत्तराधिका-याच्या प्रस्तावावर कुंभमेळ्यात चर्चा

 

प्रयागराज : वृत्तसंस्था
११ वर्षांपूर्वी कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. सलग तिस-यांदा पंतप्रधान होऊन त्यांनी धर्मसंसदेचा विश्वास सार्थ ठरवला. दरम्यान, आता २०२५ च्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

आगामी महाकुंभ मेळ्यात भाजपच्या संभाव्य पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव समोर येऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिका-याने याची माहिती दिली. यात योगी आदित्यनाथ यांच्या नावावर सर्वांचे एकमत असल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी असून योगींचे नाव आता घोषित केले जाणार नाही, पण त्यांना प्रोजेक्ट करण्याची तयारी झाली आहे.

भाजपचे स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतल्या. महाराष्ट्रात त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ नारा देत आक्रमक प्रचार केला. त्यांनी १७ उमेदवारांसाठी ११ सभा घेतल्या. यात १५ जण विजयी झाले. यावेळी धर्मसंसद होणार नाही. यावेळी अनेक विषयांवर चर्चा होईल, प्रस्ताव मांडले जातील पण निर्णय घेतला जाणार नाही.

वक्फ बोर्डाप्रमाणे सनातन बोर्ड
कुंभमेळ्यात सनातन बोर्डाचा प्रस्ताव येऊ शकतो. वक्फ बोर्डाबद्दल मुस्लिम समुदायाने खूप आधीच विचार केला होता. सनातन धर्माला एका मंचावर आणण्यासाठी काही पाऊल उचललेले नाही. बोर्ड हे असे व्यासपीठ असेल जिथे सनातनी एकत्र येतील. सनातनशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल, असे आखाडा परिषदेच्या रविंद्र पुरी यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR