लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेअंतर्गत महिलांना मोफत सिटी बसचा लाभ घेण्यासाठी १ जानेवारीपासून स्मार्टकार्ड लागू करण्यात आले. महिलांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये उपक्रम राबविण्यात आला.
जास्तीत जास्त महिलांना मोफत सिटी बसचा लाभ मिळावा यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. शहरातील महिलांना स्मार्ट कार्ड काढण्यामध्ये सुलभता यावी, यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनूसार प्रभाग क्रमांक १० मध्ये स्मार्ट कार्डसाठी नोंदणीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन माजी महापौर अॅड. दीपक सुळ, बालाजी मुस्कावाड, रत्नदीप अजनीकर, माजी नगरसेविकास कांचन अजनीकर, मिलींद श्रीमाळे, महेश शिंदे, रफिक शेख, नरसिंग भाटकुळे, प्रांजल सोनकांबळे, किर्ती जोंधळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.