लातूर : प्रतिनिधी
मोबाईल चोरांच्या टोळीतील पाचजणांना ४ लाख २१ हजार रुपये किमतीचे चोरीच्या ३४ मोबाईलसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यात आसिफ सत्तार सय्यद, जब्बार सत्तार सय्यद, बाबा सत्तार सय्यद, सर्व राहणार लालबहादूर शास्त्रीनगर लातूर, मुस्तफा सत्तारमिया शेख, राहणार बरकत नगर लातूर सध्या राहणार करीमनगर, गरुड चौक लातूर, मोहम्मद रिजवानुल हक अब्दुल रजाक गवंडी, राहणार दत्तनगर निलंगा, यांंचा समावेश आहे. यातून विवेकानंद पोलीस ठाण्याचा मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघड झाला असून मोबाईल चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक करीत आहेत. पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, मनोज खोसे प्रदीप चोपणे, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती नलिनी गावडे पोलीस अमलदार संतोष देवडे, शैलेश सुडे यांनी केली आहे.