27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रम्हैसमाळला उभारणार ४० वे सी-डॉप्लर रडार

म्हैसमाळला उभारणार ४० वे सी-डॉप्लर रडार

४०० किमी रेंजमधील हवामानाची सविस्तर माहिती मिळणार

संभाजीनगर : प्रतिनिधी
देशातील ४० वे सी-डॉप्लर रडार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील अर्धा एकर जागेत बसविण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने यासाठी पूर्वीच मंजुरी दिली होती. गेल्या आठवड्यात रडारसाठी म्हैसमाळ येथे जागा मिळाली. ती जागा इंडियन मेट्रालॉजिकल डिपार्टमेंटला देण्यात आली आहे. साधारणत: मे २०२५ मध्ये याचे काम सुरू होईल.

एक ते दीड वर्षात ते काम पूर्ण झाल्यानंतर रडारच्या सुमारे ४०० किमी रेंजमधील हवामानाची इत्यंभूत माहिती मिळेल. ज्यामुळे येथील शेतकरी, शेती, पशुधन संरक्षण होण्यास मदत होईल. अवकाळी पाऊस, तापमान, दुष्काळ, गारपीट, ढगफुटी, चक्री वादळाची माहिती रडारमुळे मिळू शकेल.

माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी रडारची तांत्रिक माहिती देताना अर्धा एकर जागा ताब्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. खा. डॉ. कराड यांनी मागील चार वर्षांपासून रडार बसविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने सी बँड डॉप्लर रडार मंजूर केले आहे. म्हैसमाळ समुद्रसपाटीपासून ऊंच असल्याने तेथे रडार व इतर यंत्रणा असेल. वन विभागाने त्यासाठी जागा दिली आहे. मराठवाड्याच्या कृषी, औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने रडारकडून मिळालेली माहिती महत्त्वाची असेल.

या रडारमुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंतच्या हवामानाचे अचूक अनुमान मिळेल. शेतक-यांना हवामान माहितीचा सर्वाधिक फायदा होईल. खुलताबाद-म्हैसमाळ या उंच ठिकाणी रडार बसविण्यासाठी आयएमडीने तयारी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR