37.7 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeमहाराष्ट्रयंदा बारावीत पैकीच्या पैकी कोणालाच नाही

यंदा बारावीत पैकीच्या पैकी कोणालाच नाही

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मागील वर्षापेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाच्या निकालात शंभर टक्के कोणालाही मिळवता आले नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यंदा मंडळाने बारावीच्या परीक्षाही लवकर घेतल्या होत्या.

बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील १ हजार ९२९ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच ९० ते ९९.९९ टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ४ हजार ५६५ आहेत.

शून्य टक्के निकाल किती कॉलेजचा
राज्यात १० हजार ४९६कॉलेजातून विद्यार्थी बसले होते. त्यात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ३८ आहेत. यंदा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी लागला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७% होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने कमी झाला आहे. यंदा २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काऊट गाईडचे गुणे मिळाले आहेत. यंदा तृतीयपंथी १८ विद्यार्थी बसले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR