35.6 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeलातूरयंदा मसाल्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ

यंदा मसाल्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ

लातूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून भारतीय आहारात मसाल्याचे महतव फार आहे. बाजारात विविध कंपन्यांचे बंद पॅकेट मसाले अगदी दहा रूपयांपासून किलोच्या दरात विकले जात असले तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच वर्षभरासाठी लागणारा मसाला हा महिला वर्ग तयार करून घेतात. प्रतेक घरा-घरा त्यांच्या खाण्यापिण्याच्या आहार पद्धतीनुसार ते तयार करून घेतात.  गतवर्षाच्या तूलनेत यंदा मसाल्याच्या किमतीत तब्बल १० ते २० टक्क्यांनी वाढ झाले असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले.
शहरातील बाजारपेठेत मसाल्या बरोबरच किचनमध्ये दैनंदिन वापरातील प्रत्येक वस्तू महागली आहे. मसाले सोडून स्वयंपाक करणे अवघड झाले आहे. बजाारात मिरची, हळद, खसखस, सुटे मसाले अशा सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे स्वयंपाकाचा खर्च आता मोठया प्रमाणावर वाढला आहे. पूर्वापार चालत असलेली ही परंपरा आजतागायत कायम आहे. प्रत्येक कुटुंब त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आहार पद्धतीनुसार सुटे जिन्नस आणून मसाला तयार करते. यंदा मसाल्याच्या किमतीत तब्बल १० ते २० टक्के वाढ झाल्याने मात्र गृहिणीचे बजेट गोमलडले आहे. गतवर्षी महिला वर्गांकडून एप्रिल-मे या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात घरामधे लागणारे मसाले तयार केले जातात.
मसाला तयार करण्यासाठी लागणारे सुटे तिन्नस खरेदीला बाजारात वेग आला आहे. बाजारपेठेतून सुटे जिन्नर मसाले खरेदी करून एप्रिल-मे महिन्यात वाळवून त्यांला कुटले जातात आणि वर्षभर लागणारा मसाला तयार केला जातो. शहरातील बाजारपेठेत मसाल्याचे भाव ठोकमध्येच महाग झाल्याने किरकोळमध्ये याचे दर अधिकच कडाडले आहे. गरम मसाल्यांच्या किमती वाढल्याने गृहिणी चिंतित आहेत. तर हॉटेलवाल्यांनाही मसाल्यांच्या खरेदीसाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे. खड्या मसाल्यांमध्ये अधिक तेजी आहे. गतवर्षी खोबरा डोल २०० रुपये किलो होते. त्यातही वाढ झालेली आहे. लवंग, खडी हळद, जायफळ, दालचिनी, लाल मिरची, ओवाचे दर गतवर्षीपेक्षा अधिक आहे.
शहरातील बाजारात धना १६० ते २०० रूपये प्रतिकिलो, ववा २५० ते ३५० रूपये प्रतिकिलो, मेथी ९०० ते ९२० रूपये प्रतिकिलो, त्रिफळ ५०० ते ६०० रूपये प्रतिकिलो, काळी मिरी ८०० ते ९०० रूपये प्रतिकिलो, नकिश्वर २००० ते २२०० रूपये प्रतिकिलो, मोठी विलाईची १९०० ते २१०० रूपये प्रतिकिलो, जीरा ३०० ते ३२० रूपये प्रतिकिलो, शहाजीरा १००० ते ११०० रूपये प्रतिकिलो, रामपत्री १५०० ते १७०० रूपये प्रतिकिलो, बादीया कर्णफुल ५०० ते ६०० रूपये प्रतिकिलो, दालचिनी ३०० ते ३२० रूपये प्रतिकिलो, सुंट ३२० ते ३५० रूपये प्रतिकिलो, खसखस २००० ते २१०० रूपये प्रतिकिलो, तमाल पत्र १५० ते १६० रूपये प्रतिकिलो, दगड पुल ६०० ते ६५० रूपये प्रतिकिलो, तीळ १६० ते २०० रूपये प्रतिकिलो,  खोबरे २२० ते २४० रूपये प्रतिकिलो, लवंग ९०० ते ११०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे बाजारपेठेत विक्री केली जात असल्याचे व्यापारी प्रदिप स्वामी यांनी सागीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR