मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू यझुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा आज (२० मार्च) घटस्फोट झाला आहे. वांद्रे कुटुंब न्यायालयात आज यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटावर सुनावणी झाली. यावेळी यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही वांद्रे कुटुंब न्यायालयात दाखल झाले होते. या सुनावणीत यझुवेंद्र्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. २२ डिसेंबर २०२० रोजी यझुवेंद्र आणि धनश्री लग्नाच्या बेडीत अडकले होते.
वांद्रे कुटुंब न्यायालयाने घटस्फोटासाठीचा किमान कालावधी हटवण्यास कुटुंब न्यायालयाने नकार दिला होता. यानंतर वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निकालाला यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिलासा नाकारल्याचा निर्णय रद्द केला. तसेच आगामी आयपीएलपूर्वी यझुवेंद्र चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यानंतर आज वांद्रे न्यायालयाने यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.
नुकतीच चहलने धनश्रीला ४.५ कोटींची पोटगी देण्यास संमती दर्शवल्याचे वृत्त समोर आले आहे. य्
चहलने धनश्रीला ४.७५ कोटी रुपये देण्याचे केले मान्य-
धनश्री आणि यझुवेंद्र यांच्या मध्यस्थीने पोटगीच्या अटींवरही अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनश्रीला चहलने ४.७५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. फेब्रुवारी २०२४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना दोघांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. त्यावेळी दोघांनी सहा महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्याची विनंती केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने ती विनंती नाकारली.