31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeमहाराष्ट्रयुगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा

युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा

 उदयनराजेंची अमित शहांकडे प्रमुख मागणी

रायगड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्षे बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकरून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर केली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. यावेळी खासदार भोसले यांनी अमित शहा यांच्याकडे या मागण्या केल्या.

उदयनराजे भोसले म्हणाले, आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. समतेचा विचार त्यांनी दिला होता. एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले. स्वराज्याची स्थापना केली, लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता. स्वत:चं आयुष्य वेचलं, आता त्यांचा अवमान केला जात आहे, असेही खासदार भोसले म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्षे बेल मिळाली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकरून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात याव्े. जेणेकरून एखादा स्वत:च्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होत आहेत, यामुळे एका सेंसर बोर्डची स्थापना व्हावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR