16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeहिंगोलीयुतीच्या उमेदवाराला मुस्लिम मतांची गरज नाही

युतीच्या उमेदवाराला मुस्लिम मतांची गरज नाही

कळमनुरीचे आ. संतोष बांगर यांचे वक्तव्य

हिंगोली/प्रतिनिधी : लोकसभेचे एनडीएचे उमेदवार शिंदे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे वसमत येथे उद्घाटन झाले. या प्रसंगी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मुस्लिम मतांची आम्हाला गरज नसल्याचे जाहीर सभेत सांगितले.

त्यामुळे हिंगोली लोकसभेतील शिंदे गटाचे व युतीचे उमेदवार बाबुराव कदम यांना मुस्लिमांच्या मतांची गरज नसल्याचे जाहीरपणे सांगितल्याने हिंगोली लोकसभेतील मुस्लिम मतदार नाराज झाला असून शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवाराविरुध बोलताना दिसत असून निवडणूक आचारसंहितेत जातीच्या नावावर मते मागता येणार नाहीत वरील घटनेनंत आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून यावर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी काय भूमिका घेतात याकडे अल्पसंख्याक मतदारांचे लक्ष लागले आहे.

मुस्लिम समाजाबद्दलचे वरील वक्तव्य एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने वापरले असते किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याने वापरले असते तर त्यावर निवडणूक अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली असती, अशी चर्चा हिंगोली मतदारसंघातून होत आहे. वरील प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोग या प्रकरणावर काय निर्णय घेतो याकडे मुस्लिमांचे लक्ष लागले असून या मतदारसंघात मुस्लिमांना मतदानापासून वंचित ठेवण्याच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR