इस्लाम धर्मियांचे पवित्र स्थळ मक्कावर हल्ल्याचा प्रयत्न उधळला

अबूधाबी : वृत्तसंस्था
इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ मानल्या जाणा-या मक्का शहराच्या दिशेने हुथी बंडखोरांनी डागलेला एक ड्रोन सौदी आघाडीच्या सैन्याने हवेतच रोखून नष्ट केला आहे. या गंभीर घटनेमुळे पवित्र शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, या युद्धावर पडदा पाडण्यासाठी चीनने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेण्यासाठी बीजिंगला रवाना झाले आहेत.

हुथी बंडखोरांच्या सततच्या ड्रोन हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाने आपल्या ‘यांबू’ बंदरावरील तेलाचे लोडिंग तूर्तास थांबवले आहे. तथापि, सौदीचा पूर्व-पश्चिम पाईपलाईन मार्ग येत्या काही दिवसांत पुन्हा पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी व्यक्त केली आहे.

हुथीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडींवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘बाब अल-मंदिब’ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक पूर्णपणे सुरक्षित आहे. सौदी अरेबिया या जलमार्गाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही हुथी प्रशासनाने केला आहे. दरम्­यान, संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, येमेनच्या पश्चिम किनारपट्टीवर अचानक वाढलेल्या सशस्त्र संघर्षामुळे देशांतर्गत तब्बल १ लाखांपेक्षा जास्त नागरिक विस्थापित झाले आहेत. यामुळे हजारो लोकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

‘मक्का आणि भाविकांची सुरक्षा ही आमची रेड लाईन’
इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे आणि तेथे येणा-या भाविकांची (जायरीन) सुरक्षा ही आमच्यासाठी ‘रेड लाईन’ असल्याचे सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने बुधवारी स्पष्ट केले. येमेनमधील हुथी बंडखोरांनी मक्का शहराच्या दक्षिणेकडून डागलेला एक ड्रोन सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केल्यानंतर हे विधान समोर आले आहे. सौदी आघाडीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ‘मक्का अल-मुकर्रमा’च्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच या ड्रोनला रोखण्यात आले.
‘शत्रुत्वपूर्ण आणि दहशतवादी कृत्य’

आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या घटनेला ‘शत्रुत्वपूर्ण आणि दहशतवादी कृत्य’ म्हटले आहे. ड्रोन डागणा-या संघटनेचा उल्लेख त्यांनी ‘दहशतवादी हुथी मिलिशिया’ असा केला. अल-मलिकी म्हणाले की, दोन पवित्र मशिदी आणि भाविकांची सुरक्षा ही आमची रेड लाईन आहे. हुथी चळवळीविरुद्ध आवश्यक आणि प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास आघाडीची संयुक्त सैनिक कमान मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येमेनमधील सौदी आघाडी आणि हुथी बंडखोरांमधील लष्करी तणाव आणि आरोप-प्रत्यारोप वाढत असताना ही कारवाई झाली आहे.

मक्का शहराला लक्ष्य करण्याचा दुसरा प्रयत्न!
मक्का शहराला लक्ष्य करण्याचा हा दुसरा प्रयत्न असल्याचे सौदी आघाडीने म्हटले आहे. यासाठी त्यांनी २७ जुलै २०१७ रोजी घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला, ज्यामध्ये मक्काच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे सांगितले गेले होते. ताजी घटना भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि तेथील नागरिकांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे अल-मलिकी यांनी सांगितले.

हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल
अल-जौफ, अल-बायदा, सादा आणि अमरान प्रांतातील इतर ठिकाणांवरही हल्ले झाल्याचा दावा हुथी प्रवक्त्याने केला आहे. मात्र, या दाव्यांना स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही. या क्रूर हल्ल्यांचे उत्तर दिल्याशिवाय सोडले जाणार नाही, असे हुथी प्रवक्त्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत हुथींनी येमेनमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवल्याने सौदी अरेबियाची चिंता वाढली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news