36 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्र‘यूज अँड थ्रो’च्या मध्ये बाळासाहेबांचा ‘ब’ आहे

‘यूज अँड थ्रो’च्या मध्ये बाळासाहेबांचा ‘ब’ आहे

मुंबई : प्रतिनिधी
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंवर ‘यूज अँड थ्रो’ राजकारणाचा आरोप केला. त्यांनी शिवसेना फोडण्याचा शिंदेंचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे म्हटले. शिंदेंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’वर टीका करत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करून शिंदेंना म्हणाले. ‘यूज अँड थ्रो’च्या मध्ये बाळासाहेबांचा ब आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसंशि आणि यूबीटी या दोन शब्दांवरून राजकारण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख करताना एसंशिं असा केला होता. तर दुसरीकडे याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारलं असता त्यांनी याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली. तुमचा शॉर्टफॉर्म यूटी होतो म्हणजे ‘यूज अँड थ्रो’ म्हणायचं का? असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी केला होता. आता यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना एकनाथ शिंदेंच्या साता-याच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल प्रश्न करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे ब हे नाव आहे, त्यांचे नाव कसे काढणार, त्यात मध्ये ब आहे. तो काढता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता. ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी ठेवायची हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण एकनाथ शिंदेंच्या त्या ड्रीम प्रोजेक्टला संमती मिळाली नाही. शिवसेना आजही मजबुतीने उभी आहे. आमदार, खासदार गेले असतील, पण त्यांचा जो पक्ष आहे एसंशिं त्यांनी यूज अ‍ॅण्ड थ्रो असे म्हटले. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे ब हे नाव आहे, त्यांचे नाव कसे काढणार. त्यात मध्ये ब आहे. तो काढता येणार नाही. कारण बाप आहे तो. बापाचा ब काढणार का. जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसंशिं काही करू शकत नाही’, असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR