26.9 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रयेत्या ५ वर्षात राज्यातील वीजदर कपात होणार

येत्या ५ वर्षात राज्यातील वीजदर कपात होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधान भवनात सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत.

दरम्यान त्यांनी राज्यातील वीजदराबाबत आज (दि.१० मार्च) मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी राज्यातील वीजदर कपातीचे संकेत दिले आहेत.

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळातील अर्थसंकल्प माडताना म्हटले आहे की, महावितरण कंपनीने येत्या ५ वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे. यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR