Homeधाराशिवयेरमाळ््यात १५ लाखांवर भाविक

येरमाळ््यात १५ लाखांवर भाविक

येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

येरमाळा : प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणा-या येरमाळा (ता. कळंब) येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्री पालखी सोहळा आई राजा उदे उदे… येडासरीचा उदे उदेच्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या यात्रेत राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक दाखल झाले होते. देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. येरमाळ््यात सोलापूर-धुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान, यात्रेच्या वेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मागील १० वर्षांपासून अविरत सुरू असलेली हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आजही पालखी सोहळ््यादरम्यान करण्यात आली. या अनुपम सोहळ््यासोबतच लाखो भाविकांच्या सोयीसाठी येरमाळा देवस्थानला पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर विशेष यात्रा अनुदान मिळवून देण्याचा संकल्प आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला. मागील दशकापासून आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पालखी सोहळ््यावर पुष्पवृष्टी करण्याचा उपक्रम सुरू केला, तो आता या यात्रेची एक नवी ओळख बनला आहे. पालखी मार्गस्थ होत असताना आकाशातून होणारा फुलांचा वर्षाव पाहून उपस्थित १० ते १५ लाख भाविकांच्या डोळ््यांचे पारणे फिटले. केवळ उपस्थित राहणेच नव्हे, तर आ. पाटील यांनी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार चुनखडी वेचण्याच्या विधीमध्ये स्वत: सहभागी होऊन आई येडेश्वरीचे मनोभावे दर्शन घेतले.

येरमाळा येथील चैत्र यात्रेला दरवर्षी १० ते १५ लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. सध्या या भव्य यात्रेच्या नियोजनाचा आर्थिक भार ग्रामपंचायतीवर पडतो. भाविकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळा यात्रेला विशेष यात्रा अनुदान मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR