22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरयेरोळ मोडला शेतक-यांचा चक्का जाम

येरोळ मोडला शेतक-यांचा चक्का जाम

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शेतातील कोवळी पिक खाऊन फस्त करर्णा­या हरीण, रानडुक्कर यांचा बंदोबस्त करावा, शेतक-यांना पिक कर्ज मुक्त करावे, खते व शेती साहित्य जीएसटी मुक्त करावीत.तसेच शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांना उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे, यांसह विविध मागण्याबाबत  येरोळ मोड येथे बुधवारी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या नेतृत्वात शेतक-यांंनी चक्का जाम आंदोलन करून मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.या आंदोलनात मी शेतकरी असे लिहीलेली गांधी टोपी शेतक-यानी परिधान केली होती. यावेळी शेतकरी हक्काच्या घोषणा ही देण्यात आल्या
या चक्काजाम आंदोलनामुळे उदगीर – लातूर महामार्गावरील वाहतुक चार तास खोळंबली होती. वनविभागाच्या अधिकारी श्रीमती एस.जी.गीते, नायब तहसिलदार तानाजीराव यादव, मंडळ अधिकारी नवनाथ खंदाडे यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्विकारले. या प्रसंगी हरीण व रानडुक्कर प्राण्यापासून शेती पीकाचे संरक्षण करण्यात यावे, यासाठी १०० टक्के सबसीडीवर तारकिंवा सौर ऊर्जा कंपाउंड देणे, शेतक-यांना संपुर्ण पिक कर्ज मुक्त करण्यात यावे, नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजारांचे अनुदान वंचित राहिलेल्या शेतक-यांना देण्यात यावे, मागच्या वर्षीचा पीक विमा देण्यात यावा, गाईच्या दुधाला किमान ४० रूपये भाव देण्यात यावा, पर्जन्य मापक यंत्र प्रत्येक ग्रामपंचायतीला बसविण्यात यावे, शेतकरी व शेतमजूराच्या पाल्यांना उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे, शेती औजारे किटकनाशक औषधे खते व शेती निगडित सर्व साहित्य जीएसटी मुक्त करावे, आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
   यावेळी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलिस उपनिरीक्षक  गजानन अनसापुरे, पोलीस जमादार शिवकुमार बिरादार, सुर्यप्रकाश गिरी, सचीन चामे, गोंिवद मलवाडे,श्रीराम तांडूर, पंढरीनाथ केंद्रे, संदिप तिपराळे, अंबादास पाटील, प्रवीण कदम व गोपनीय शाखेचे येडले पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR