30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeलातूरयेलमवाडीतील तरुणाचा अनसरवाडा रस्त्यावर खून

येलमवाडीतील तरुणाचा अनसरवाडा रस्त्यावर खून

निलंगा :  प्रतिनिधी
तालुक्यातील येलमवाडी येथील एका तरुणाचा अनसरवाडा रोडवर खून झाल्याची धक्कादायक घटना  दि १२ जून बुधवार रोजी समोर आली आहे. विकास नामदेव थोरमोटे वय २८ वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
निलंगा तालुक्यातील येलमवाडी येथील विकास नामदेव थोरमोटे हा तरुण शेती व ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोणालातरी फोनवर बोलताना शिवीगाळ करत तो घरुन निघाला. कालांतराने त्याचा मोबाईल बंद लागत असल्याने घरच्या मंडळींनी निलंगा येथे नातेवाईक व मित्राकडे शोध घेतला असता त्याचा पत्ता लागला नाही. बुधवारी सकाळी अशोकनगर भागातून अनसरवाडा गावाला जाणा-या रोडच्या बाजूस विकासचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. तात्काळ घटनास्थळी नातेवाईक,उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. मयत विकासचे कपडे मृतदेहापासून दूरवर पडलेले आढळून आले. घटनास्थळी श्वान व ंिफगरंिप्रट पथक पाचारण करुन तपासणी करण्यात आली.
निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर येलमवाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मयत विकासचे मोबाईल लोकेशन सीडीआर काढून पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास करीत असून संशयित चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रेम प्रकरणकिंवा अनैतिक संबंधातून खून झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR