Homeमनोरंजनरणवीर सिंहकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी

रणवीर सिंहकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई गँगने १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. बिश्नोई गँगने अभिनेत्याला ज्या नंबरवरून धमकीची व्हॉईस नोट पाठवली होती, तो मेसेज एका अमेरिकन नंबरवरून आला होता. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, क्राईम ब्रँच प्रोटोकॉलनुसार त्या नंबरची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात समोर आले आहे की, सध्या बिश्नोई गँगचा खास हस्तक असलेल्या ‘हॅरी बॉक्सर’ने व्हॉईस नोट पाठवून रणवीर सिंहला धमकी दिली आणि १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. क्राईम ब्रँचच्या प्राथमिक तपासात रणवीर सिंहच्या मॅनेजरच्या व्हॉटस्अ‍ॅपवर आलेल्या व्हॉईस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅरी बॉक्सरने ही व्हॉईस नोट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर पाठवली होती. रणवीर सिंहला मिळालेली ही धमकी त्याच्या मॅनेजरच्या मोबाईल नंबरवर व्हॉईस नोटद्वारे पाठवण्यात आली होती. या धमकीनंतर रणवीर सिंहच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बिश्नोई गँग बॉलिवूडला टार्गेट करत आहे. रणवीर सिंहच्या आधी बिश्नोई गँगने सलमान खान, कपिल शर्मा, पवन सिंग आणि रोहित शेट्टी यांसारख्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. त्यानंतर या सर्व सेलिब्रिटींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR