22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूर‘रन फॉर स्वराज्य’ मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद

‘रन फॉर स्वराज्य’ मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात, चेह-यावर उत्साह, प्रचंड आत्मविश्वास, धावण्याची मनातील जिद्द आणि मॅरॅथॉन जिंकण्याचे धेय्य, स्पर्धकांचा उत्साह वाढवणा-या स्फूर्तिदायक घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि कानी पडणारे देशभक्त्तीपर गीत अशा या उत्साहपूर्ण वातावरणात श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे आद्य संस्थापक स्व. सेठ पुरणमल लाहोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. १० फेब्रुवारी रोजी संस्था अंतर्गत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘रन फॉर स्वराज्य’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजता राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणातून अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ अजय देवरे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर स्पर्धकांचा सुरु झाला धावण्याचा प्रवास.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा ३५० व्या शिवराज्याभिषेक लोकोत्सव समितीचे अध्यक्ष हुकुमचंद कलंत्री यांची तर  संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, सहउपाध्यक्ष दिनेशकुमार इन्नाणी, कोषाध्यक्ष ईश्वरप्रसाद डागा, सदस्य कमलकिशोर अग्रवाल, बालकिशन बांगड,  संजय बियाणी, सुहास शेट्टी, किशोर भराडिया, आशिष अग्रवाल,  चैतन्य भार्गव, रवींद्र व्होरा, संजय भराडिया, आनंद लाहोटी, वंदना इन्नाणी, कुमोदिनी भार्गव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. राजस्थान विद्यालयातून स्पर्धेला प्रारंभ होऊन मिनी मार्केट, मेन रोड, शिवाजी चौक भुयारी मार्ग, दयानंद कॉलेज गेट, संविधान चौक, यु टर्न घेऊन परत शिवाजी महाराज चौक भुयारी मार्ग,  मेन रोड, मिनी मार्केट मार्गे स्पर्धेचा समारोप राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात झाला. मॅरेथॉन स्पर्धा ५ व ७ किलोमीटर अंतरासाठी मुले व मुली मोठा व लहान गटात संपन्न झाली.
स्पर्धेचा निकाल:
मोठा गट मुलींमधून शिवा द्विवेदी प्रथम, तेजस्वी माने- द्वितिय, भक्त्ती  जाधव – तृतीय तर राजकन्या काळे, पूजा पटाईत, सुमय्या तांबोळी- उत्तेजनार्थ. मोठा गट मुलांमधून प्रतीक येरटे- प्रथम, ज्ञानेश्वर सूर्यवंशी- द्वितीय, अनिरुद्ध देशपांडे- तृतीय आणि अमित खोसे, स्वराज हांडे, ओंकार खंडेलवाल-उत्तेजनार्थ. छोटा गट मुलींमधून ऋतूजा सोनी- प्रथम, आरोही छत्रे- द्वितीय, आदिती थोरमोटे- तृतीय तर अर्पिता गायकवाड, धनश्री होळे, अंजली जाधव- उत्तजनार्थ. छोटा गट मुलांमधून आहान सुरवसे- प्रथम, रणवीर थोरमोटे – द्वितीय, क्षितिज सुरवसे- तृतीय आणि देवेश कासले, आर्यन वाडकर, सक्षम शिंदे या स्पर्धकांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.  प्रत्येक गटातील विजेत्या सर्व स्पर्धकांना प्रथम ३१००, द्वितीय २१०० व तृतीय ११०० रुपये आणि उत्तेजनार्थ ३ अशी रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक चैतन्य भार्गव यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR