मुंबई : राज्यात २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. विविध ठिकाणांहून आचारसंहिताभंगाच्या घटना समोर येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह लावलेलं होतं, यावरून संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. तर, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी देखील रवींद्र चव्हाण यांच्या प्रकरणावर भाष्य केले आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचे चिन्ह मतदानावेळी असल्याचे व्हीडीओ समोर आले आहेत. यावरून रवींद्र चव्हाण यांच्या कृतीवरून संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचारसंहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात, काढा यांना ठेचून.
संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवरील चिन्हाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला आहे. यामध्ये त्यांनी एका बाजूला निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय, असा सवाल केला.

