22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कारने मोदी सन्मानित

रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कारने मोदी सन्मानित

दोन्ही देशांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान
मॉस्को : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून (८ जुलै) दोन दिवसीय रशिया दौ-यावर आहेत. आज (९ जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध आणि दोन्ही देशांच्या विकासामध्ये योगदान दिल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौ-यावर आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. दरम्यान, २०१९ मध्ये भारतातील रशियाचे राजदूत यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. रशियातील नागरिक आणि सैनिकांना‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आता हा मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. भारत आणि रशियातील लोकांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR