– १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये बैठक
– पुतिन यांचे झेलेन्स्कींना निमंत्रण
इस्तंबूल : गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये कोणत्याही पूर्वअटीशिवाय युक्रेनशी थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना पुतिन यांनी दोन्ही देशांमधील शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले. हे पाऊल दोन्ही देशांमधील संघर्षात एक नवीन वळण आणू शकते. रशियाने २०२२ मध्ये चर्चा खंडित केली नाही. तरीही आम्ही कीवला कोणत्याही पूर्वअटीशिवाय थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव देत आहोत. सर्वकाही असूनही, आम्ही कीव अधिका-यांना गुरुवारी इस्तंबूलमध्ये चर्चा पुन्हा सुरू करण्याची ऑफर देतो, असे पुतिन म्हणाले.
मी तुम्हाला आठवण करून देतो की या चर्चेच्या परिणामी एक संयुक्त मसुदा दस्तऐवज तयार करण्यात आला आणि कीव वाटाघाटी गटाच्या प्रमुखांनी त्यावर स्वाक्षरी देखील केली, परंतु पश्चिमेच्या आग्रहास्तव तो कच-याच्या डब्यात फेकण्यात आला, असंही पुतिन म्हणाले.
रशियाने वारंवार युद्धबंदी केली आहे. कीव अधिका-यांनी आमच्या कोणत्याही युद्धबंदी प्रस्तावांना प्रतिसाद दिलेला नाही. घोषित युद्धबंदीच्या तीन दिवसांत, कीवने रशियन सीमेवर हल्ला करण्याचे ५ प्रयत्न केले आहेत, असे रशियन अध्यक्ष म्हणाले.