चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील राचन्नावाडी येथे शुक्रवारी (दि. २८) रोजी पहाटे चोरट्या टोळीने धाडसी चोरी करीत सहा घरे फोडून १० तोळे सोने, १ किलो चांदीसह ९५ हजारांची रोकड लंपास केली आहे. राचन्नावाडी येथे दिड महिन्यात दुसरी घटना घडली आहे. एका रात्रीत ६ घरफोडी झाल्यामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाढवणा पोलिसांनी पंचनामा करून ठसे तज्ज्ञांना बोलावून घेऊन तपास केला.
राचन्नावाडी येथील सूर्यकांत राजारामचिंचोळे, बालाजी गोंिवंद भंडे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाचे लॉक मोडून चोरट्यांनींनी कानातील झुबे, बोरमाळ, मनी, चैन, अंगठी, चांदीचे शिक्के, वाळे असे १० तोळे सोने व एक किलो चांदी आणि ९५ हजारांची रोकड चोरली तर संपत मलिशे यांच्या घराचे कुलुप तोडले, गणपत राजारामचिंचोळे यांच्या घरातील कपाटाचे लॉक तोडले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले, अरंिवंद आवाळे यांचा दरवाजा तोडून कपाटाचे लॉक तोडून साड्या व इतर साहित्य टाकून झोपेत असलेल्या महिलेला बाहेरून कडी लावली. गावातील किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांंनी केला. एकाच रात्री सहा घरे चोरट्यांनी फोडली असल्याने राचन्नावाडी व परीसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राचन्नावाडी येथे दिड महिन्यापूर्वीच चोरट्यांनी तातेराव वागलगावे यांचे घर फोडून दोन तोळे सोने व ५० हजार रुपये लंपास केले होते त्याच दिवशी इतर दोघांची घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता.