23.4 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमहाराष्ट्रराजश्री अहिरराव, धनराज महाले नॉट रिचेबल!

राजश्री अहिरराव, धनराज महाले नॉट रिचेबल!

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या दोन उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध ऐनवेळी हे उमेदवार देण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार धनराज महाले (दिंडोरी) आणि राजश्री अहिरराव (देवळाली) यांना शिवसेना शिंदे पक्षाने एबी फॉर्म दिले होते. आता ते मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे हे उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या देवळालीतील विद्यमान आमदार सरोज अहिरे आणि दिंडोरी मतदारसंघातील आमदार नरहरी झिरवाळ हे अधिकृत उमेदवार होते. मात्र महायुतीतील समन्वयाअभावी हे उमेदवार अडचणीत आले होते. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे पक्षाने दोघांना एबी फॉर्म दिले होते.
यामध्ये देवळालीतून राजश्री अहिरराव आणि दिंडोरी मतदारसंघातून माजी आमदार धनराज महाले यांचा समावेश होता. यासंदर्भात स्थानिक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याबाबत शनिवारी सायंकाळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही उमेदवारांना माघार घेण्याच्या निर्णयाला संमती दिली होती. रविवारी दुपारी संबंधित निर्णय पक्षाचे जिल्हाप्रमुख व अन्य पदाधिका-यांना कळविण्यात आला होता. मात्र रात्री हे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाले.

सकाळी माजी आमदार धनराज महाले यांचा ट्रेस लागला. मात्र त्यांचा फोन अद्यापही नॉट रिचेबल आहे. सौ. जयश्री अहिरराव यांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात पक्षाचे नेते विजय करंजकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने जो आदेश दिला आहे, त्याचे पालन संबंधित उमेदवारांना करावेच लागेल. पक्षाने एबी फॉर्म दिल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR