मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
विधानमंडळ आवारात राज्यपालांच्या आगमनप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रथेप्रमाणे राज्यपालांना विधानभवन आवारात राज्य पोलीसांकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांनी राज्य विधान मंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले.