20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरराज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

उदगीर : प्रतिनिधी
येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व भरीव कार्य करणा-या व्यक्तींना दिल्या जाणा-या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन रंगकर्मी  प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण  मद्देवाड यांनी केले आहे.
रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य ,पर्यावरण ,कला व साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने मागील ९ वर्षापासून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित केले जाते. रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील लघुपट महोत्सव आरोग्य शिबिर ,पत्रकारिता पुरस्कार, साहित्य संमेलन, पथनाट्यातून विविध विषयावर जनजागृती, महापुरुषांच्या विचारावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन व  राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
मानपत्र गौरव चिन्ह असे रंगकर्मीच्या वतीने दिल्या जाणा-या पुरस्काराचे स्वरूप असून सामाजिक शैक्षणिक साहित्य कला आरोग्य पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट व भरीव कार्य करणा-या व्यक्तींनी व संस्थानी २०२५ च्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दि. २५ डिसेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील या पद्धतीने प्रस्ताव पाठवावेत. पुरस्कार वितरण जानेवारी शेवटच्या आठवड्यात होणार असून त्यासाठी प्रस्ताव  प्रा. बिभीषण  मद्देवाड, लोकाक्षर कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणेसमोर,उदगीर जिल्हा लातूर ४१३५१७ मोबाईल संपर्क : ९८२३१६०५५२ या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण  मद्देवाड, सचिव प्रा ज्योती मद्देवाड, उपाध्यक्ष सिध्दार्थ सूर्यवंशी, मारुती भोसले अ‍ॅड.  महेश मळगे, महादेव खळूरे,  रसूल पठाण, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, सचिन शिवशेट्टे, दादाराव दाडगे, विवेक होळसंबरे, प्रल्हाद येवरीकर, जहॉगीर  पटेल, नीता मोरे, ज्ञानेश्वर बडगे, टी. डी. पांचाळ आदींनी केले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR