30.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूरराज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दि. १६ एप्रिल रोजी झाले. या स्पर्धेत राज्यभरातील मुलांच्या आठ तर मुलींच्या आठ संघांनी सहभाग नोंदविला आहे. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
मुलांचा पहिला सामना सांगली विरुद्ध मुंबई तर मुलींचा पहिला सामना पुणे विरुद्ध यवतमाळ संघात झाला. या दोन्ही सामन्याचे उद्घाटन  यांनी केले. तत्पुर्वी स्पर्धेच्या मुख्य उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक लातूर जिल्हा पार्सिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख यांनी केले. त्यांनी यावेळी क्रीडा क्षेत्राशी संबंधीत अनेक मागण्या मांडल्या. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व माजी मंत्री संजय बनसोड यांनी या मागण्यांची पुर्तता केली जाईल, असे सांगीतले. पाहुण्याचे स्वागत लातूर जिल्हा पार्सिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मोईज शेख, क्रीडा समितीचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, आयोजन समितीचे सचिव दत्ता सोमवंशी, अनंत देशमुख, महेश पाळणे, प्रविण पाटील यांनी स्वागत केले. यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी लातूरचे पहिले आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू इम्रान शेख यांचा प्रमुख पाहण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी दीपक सुळ, सोनू डगवाले, कैलास पाटील, विजय देशमुख, संतोष देशमुख, अ‍ॅड. फारुक शेख, सुभाष घोडके, अ‍ॅड. अंगद गायकवाड, अविनाश बट्टेवार, सिकंदर पटेल, चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे, अ‍ॅड. गायकवाड, प्रा. प्रविण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, बालाजी वाघमारे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होती. ही स्पर्धा दि. १८ एप्रिल पर्यत चालणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR