25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याच्या प्रगतीला गती देणारे सरकार हवे : भाजप

राज्याच्या प्रगतीला गती देणारे सरकार हवे : भाजप

पुणे : (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांना करावयाचा आहे. मतदार महायुतीला कौल देऊन प्रगतीच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना राज्याच्या प्रगतीला खीळ बसली, आणि सर्वच क्षेत्रांत राज्याची पीछेहाट झाली. मुंबईतील आरे-कुलाबा मेट्रो प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेले असताना हा प्रकल्प थांबविल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्याचे १४ हजार कोटींचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले, अन्य अनेक जनहिताचे प्रकल्प रोखल्याने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि गरीब जनता सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहिली. मुंबईचा किनारी मार्ग, अटल सेतू, मेट्रो, नवे विमानतळ, झोपडपट्टी योजना, अशा अनेक सुविधा महायुती सरकारने पुढे राबविल्या आणि बिघडलेला महाराष्ट्राचा मार्ग रुळावर आणला असे ते म्हणाले..

समृद्धी महामार्गास महाविकास आघाडीने विरोध केला होता, मराठवाडा वॉटरग्रीड योनजेतून मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांनाही तत्कालीन सरकारने खीळ घातली. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेल्या जनहिताच्या आणि राज्यहिताच्या एका तरी कामाचा दाखला द्यावा, असे आव्हान भांडारी यांनी दिले. विकासाचे उपक्रम सरकार राबवू शकते, हे महायुती सरकारने सिद्ध केले आहे. विकासासोबत समाजजीवनाचा स्तर उंचावण्याच्या योजनाही राबविण्याची गरज ओळखून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी अशा अनेक घटकांसाठी महायुती सरकारने आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR