27.4 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeमहाराष्ट्रराज्याच्या राजधानीत गुंडाराज

राज्याच्या राजधानीत गुंडाराज

मुंबई : प्रतिनिधी
नागपूरच्या दंगलखोरांकडून नुकसान भरभाई वसूल करणार, हे फडणवीसांनी सांगितले आहे. मग, खारमध्ये सेटचे नुकसान केले, त्या दंगोलखोरांना तुम्ही सोडणार का? झालेले नुकसान हे दंगोलखोरांकडून भरून घेणार की नाही? हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवत आहात, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे..

दरम्यान, प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका कवितेवरून वाद उफाळला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी संदर्भात असलेल्या कवितेवरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. कुणाल कामराच्या सेटची शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. काही लोकांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या सेटची तोडफोड केली आहे. त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला का केला नाही? छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर हा सरकारच्या डोळ्यांसमोर बेपत्ता झाला आहे. कोरटकरवर हल्ला करण्याची कुणी हिंमत दाखवली नाही? अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांवर केली आहे.

कुणाल कामरा हा साधा लेख आणि पॉडकास्टर आहे. मात्र, त्याच्या सेटवर हल्ले केले जातात. करा ना कोरटकरवर हल्ला त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठिशी उभा राहिल. त्या हल्ल्याचे आम्ही समर्थन करू, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, कुणाला कामराचा एक पॉडकास्ट प्रसिद्ध झाला. त्यात त्याने ‘ठाणे की रिक्षा’वर गाणे म्हटले आहे. यावर धमक्या देण्याची सेट तोडण्याची काय गरज आहे? महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे लक्षण आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे. त्यांना गृहखाते झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिले जात नाही. बीड, परभणी आणि नागपूरला काय झाले? आता मुंबईत आता एका पॉडकास्टरचा सेट तोडण्यात आला. पोलीस काय झोपा काढत होते का?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR