मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यातील हवामान कोरडे असून तापमानाच्या पा-यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा ३० अंश पार गेला आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हे तापू लागले आहेत.
दरम्यान, राज्यातील बहुतांश भागामध्ये सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत असला तरी सकाळी १०नंतर मात्र गरमी जाणवण्यास सुरुवात होत आहे. सध्या राज्यातील हवामान कोरडे असून तापमानाच्या पा-यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा ३० अंश पार गेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ क्षेत्रामध्ये उकाडा सुरू झाला असून, इथेही तापमान ३६ ते ३७ अंशांदरम्यान आहे. राज्यातील सर्वाधिक तामपानाची नोंद सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. सोलापुरात ३६.६ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरीत ३७ अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये राज्यस्थानमधील पूर्वेकडील क्षेत्रांवर पुन्हा एकदा शीतलहरींचा परिणाम दिसून येणार आहे. तर, अतीव उत्तरेकडे असणा-या राज्याच्या पर्वतीय भागांमध्ये थंड वारे आणखी तीव्र होणार असून हीमवृष्टीत वाढ होणार आहे. मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र तापमानवाढ पाहायला मिळेल. वातावरणातील बदलामुळे सद्यस्थितीला कमाल आणि किमान तापमानात १७ ते २१ अंशांची तफावत दिसत असून, आकडेवारीतील हा फरक दीर्घकाळासाठी कायम राहण्याच अंदाज आहे.