22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ५८ पोलिस अधिका-यांच्या बदल्या

राज्यातील ५८ पोलिस अधिका-यांच्या बदल्या

नांदेड, धाराशिवसह उदगीरमधील अधिका-यांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी
आगामी काळात लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी राज्यातील ५८ वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यासंबंधीचे आदेश आज जारी करण्यात आले. यामध्ये पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त संवर्गातील पोलिस अधिका-यांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, बीड, उदगीरमधील अधिका-यांसह राज्यातील अधिका-यांचे समावेश आहे.
साहिल झरकर यांची उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर, पद्मावती कदम यांची अपर पोलिस अधीक्षकपदावर, संजीव पिंपळे यांची पोलिस उपअधीक्षक पालघर येथे, विवेक लावंड यांची पोलिस उपअधीक्षक सातारा येथे, सातारा ग्रामीणचे राजेंद्र शेळके यांची अपर पोलिस अधीक्षक पुणे येथे, सातारा शहरचे पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांची कळवण नाशिक येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर, सावंतवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांची सहायक पोलिस आयुक्त बृहन्मुंबई येथे, नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील भामरे यांची सहायक पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई येथे, मूल येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांची चंद्रपूर येथील पो आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षकपदी बदली झाली.
याशिवाय देगलूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी बीड संतोष वाळके यांची बदली पोलिस उपअधीक्षक मुख्यालय बीड येथे, कंधारचे उपविभागीय अधिकारी मारोती थोरात यांची हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षकपदी (आर्थिक गुन्हे शाखा) बदली झाली. सोलापूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांची बदली उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर येथे, ब्रम्हदेव गावडे अपर उपआयुक्त (राज्य गुप्तवार्ता) संभाजीनगर येथे, छ. संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वंभर गोल्डे यांची उपविभागीय पोलिस अधिकारी बीड येथे, छ. संभाजीनगर येथे अप्पर पोलिस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांची उपविभागीय पोलिस अधिकारी जालना येथे बदली झाली.
जालनाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांची सहायक पोलिस आयुक्त ठाणे शहर येथे, सोलापूर शहरचे सहयाक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी कामठी, जि. ग्रामीण नागपूर येथे, उदगीर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी  दिलीप भागवत यांची उपविभागीय पोलिस अधिकारी गंगापूर येथे, धाराशिव आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपाधीक्षक सदाशिव शेलार यांची उमरगा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर आणि उमरगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांची उपविभागीय पोलिस अधिकारी चांदूर रेल्वे जि. अमरावती येथे बदली करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR