20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात कांदा पीक विम्यात मोठा घोटाळा

राज्यात कांदा पीक विम्यात मोठा घोटाळा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या ८ जिल्ह्यांत कांद्याचा पीक विमा उतरवण्यात मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. पुणे,अहिल्यानगर, धुळे, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतक-यांनी कांद्याची लागवड केली नसताना पिकाचा पिमा उतरवला आहे.

कृषि विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख ४७ हजार २७२ शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी कमी क्षेत्र असताना कांद्याची लागवड जास्त दाखवून विमा उतरवल्याचेही समोर आले आहे. या आठ जिल्ह्यांत ४ लाख २३९८ शेतक-यांनी दोन लाख २४ हजार ३१८ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली आहे. यात ८३ हजार ९११ शेतक-यांनी ४९ हजार ९३५ हेक्टरवर कांदा लागवड न करताच विमा उतरवल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

६०२८५ शेतक-यांनी २८ हजार ८६ हेक्­टरवर कमी क्षेत्रात असताना देखील अधिकच्या क्षेत्रावर कांदा दाखवत विमा उतरवला. कृषि विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख ४७ हजार २७२ शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कांदा पीक क्षेत्र तपासणी अहवालानुसार, अधिकचे लागवड क्षेत्र दाखवून पीक विम्याची संरक्षिक केलेले अर्ज हे सोलापूर, सातारा, संभाजीनगर, नाशिकमध्ये सर्वाधिक असल्याचे या आकड्यांवरून दिसते.
राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कांदा पीक विमा घोटाळा
राज्यातील आठ जिल्ह्यांमधील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कांदा पिकासाठी येणा-या अर्जांमध्ये अधिकचे क्षेत्र दाखवून पीक विमा उतरवल्याचे समोर आले आहे. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, सातारा, धुळे, पुणे व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये कमी क्षेत्र असताना कांद्याची लागवड जास्त दाखवून पीक विमा उतरवला आहे. कृषि विभागाकडून विमा कंपन्यांना एक लाख ४७ हजार २७२ शेतकरी अपात्र करण्याच्या सूचना करणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

सोलापुरातून सर्वाधिक अर्ज
सोलापूर जिल्ह्यात कांद्याची लागवड अधिक आहे असे सांगून पीक विमा उतरवण्यासाठी अर्ज केलेल्या शेतक-यांची संख्या ही सर्वाधिक असून ती ४१ हजार ८६५ इतकी आहे. ३७ हजार २३० हेक्टर एवढे या जिल्ह्याचे कांद्याचे पेरणी क्षेत्र आहे. कृषि विभागाने केलेल्या तपासणीत कांदा पीक आढळून न आलेले यातील ३६,४३८ एवढे अर्ज आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR