मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातवरण पाहायला मिळाले तरीही गारठा कायम होता. तसेच मुंबईसह अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बरसला. आज वातावरणात गारठा असून तापमानात चढ-उतार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. या ढगाळ वातावरणाचा परिणाम थंडीवर झाला. आज नाशिक, निफाड, मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे.
ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली उतरला आहे.
तापमानात होणा-या सततच्या बदलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे थंडीचा परिणाम शेतक-यांच्या हंगामी पिकांवर झाला आहे.

