37.4 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात दोन भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

राज्यात दोन भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

बुलडाणा : प्रतिनिधी

राज्यात मंगळवारी दोन भीषण अपघात आले. बुलडाणा जिल्ह्यात बस आणि विटा वाहतूक करणा-या ट्रकचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात सांगली-मिरज-पंढरपूर-कुची फाट्याजवळ झाला. ट्रक-टेम्पोच्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणा-या १८ चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणा-या वाहनाची आमसरी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खामगाव ते नांदुरा महामार्गावरील भीषण अपघातात बसमधील १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. जखमींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात हलविले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू केले आहे.

पंढरपूर महामार्गावरील अपघातात तीन ठार
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिला द्राक्षबाग तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील खेरडी गावामध्ये गेले होते. ते रात्री परतताना कवठेमहांकाळ-पंढरपूर महामार्गावरील कुची फाटा येथे मागून येणा-या १८ चाकी ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात तीन महिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर आठ महिला आणि चालक जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये भारती कांबळे, रेखा कांबळे, राणी वडर, या महिलांचा समावेश आहे. अपघातात ट्रकची धडक इतकी जोराची होती की धडकेत टेम्पो उलटून काही महिला टेम्पोतून बाहेर फेकल्या गेल्या होत्या. घटनास्थळाहून ट्रकचालकाने पळ काढला आहे. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला मिरज तालुक्यातील म्हैशाळ या गावातील आहेत. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR