32.4 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा एकदा ७ अधिका-यांच्या बदल्या

राज्यात पुन्हा एकदा ७ अधिका-यांच्या बदल्या

राजेंद्र भारुडांची दुस-यांदा बदली

मुंबई : प्रतिनिधी
काहीच दिवसांपूर्वी ६ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याचे समोर आले होते. पण, त्यानंतर आता पुन्हा एकदा मंगळवारी (१ एप्रिल) ७ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या राज्यात अधिका-यांच्या बदल्यांचा सपाटा अद्याप थांबताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून गेल्या काही महिन्यांमध्ये शेकडो अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये अनेक अधिका-यांच्या बदल्या या अवघ्या काही दिवसांच्या तर काही महिन्यांच्या अंतरात करण्यात आल्या आहेत. नुकतेच समोर आलेल्या यादीमध्येही अशा काही चर्चित नावांचा समावेश आहे.

समोर आलेल्या यादीनुसार, वरिष्ठ सनदी अधिकारी निधी पांडे यांची लघुउद्योग खात्याच्या व्यवस्थापक संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर, लक्ष्मी नारायण मिश्रा यांची एमएसआरडीसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे.

तर, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर, सनदी अधिकारी नेहा भोसले यांची रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखर यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

दोन महिन्यांत दुस-यांदा बदली
डॉ. राजेंद्र भारुड यांची फेब्रुवारी महिन्यामध्ये ळफळकच्या आयुक्तपदावरून रुसामध्ये प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे उद्योग विभागाच्या अतिरिक्त विकास आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR