27.3 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

राज्यात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मराठवाड्यातील ब-याच अधिका-यांचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी
विहित कालावधी पूर्ण झालेल्या आणि विनंतीचा सांगोपांग विचार करून राज्यात आज पोलिस निरीक्षकपदाच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये १२० अधिका-यांचा समावेश आहे. त्यात मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, बीड, लातूर आदी शहरांतील पोलिस अधिका-यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील रमेश चिमाजी वाघ यांची मुंबई शहर, जाफर नासर बेग मोगल यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे, लातूरमधील करण गुणाजी सोनकवडे यांची मुंबई शहरात, जालन्यातील शालिनी देवराव नाईक यांची हिंगोली जिल्ह्यात बदली झाली आहे. यासोबतच बुलडाण्यातील जगदीश मंडलवार यांची परभणीत बदली झाली आहे. तसेच पुण्यातील मनोहर इडेकर यांची परभणीत बदली झाली. बीडमधील संतोष खेतमाळस यांची पुणे शहरात, धाराशिवमधील बबिता सुधाकर वाकडकर यांची धाराशिवमध्येच बदली केली. नांदेडमधील शरद दामोदर ज-हाड यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना येथे बदली करण्यात आली.

विशेष सुरक्षा विभागाचे नितीन इंद्राळे यांची पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे बदली करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाचे विनोद मैत्रेवार यांची नांदेड येथे बदली, नागरी हक्क संरक्षण विभागाचे भूजंग गोडबोले यांची नांदेड येथे बदली करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे किरण बिडवे यांची जालन्यात बदली केली. विशेष सुरक्षा विभागाचे अनंत भंडे यांची नांदेड येथे बदली,मुंबई शहरातील श्रीकांत डोंगरे यांची परभणीत बदली झाली. सोलापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील संग्राम थोरात यांची धाराशिवला बदली झाली. नागपूर शहरातील संतोष पाटील यांची लातूर येथे बदली करण्यात आली. याशिवाय मुंबई शहरातील आनंद केशवरावझोटे यांची छ. संभाजीनगर ग्रामीणला बदली करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR