पुणे : प्रतिनिधी
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला फार जोर नाही त्यामुळे खरीप पिकांची पेरणी अथवा राज्यातील धरणातील पाणीसाठा यावर परिणाम होऊ लागला आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवसांत राज्याच्या विविध भागात दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसेच घाटमाथ्यावर देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुणे शहर परिसरात हवामान ढगाळ राहून हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात हवामान अधूनमधून ढगाळ राहून हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत, मुख्य म्हणजे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही परिणामी धरणातील पाणीसाठा कमी होत असून ही स्थिती अशीच राहिल्यास पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी शहरात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठा पाऊस झाला आहे. हा अपवाद वगळता अद्याप जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद नाही.
—