36.5 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात वाढत आहेत चिकनगुनियाचे रुग्ण

राज्यात वाढत आहेत चिकनगुनियाचे रुग्ण

पुणे : राज्यातील बदलत्या वातावरणाचा परिणाम हा अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. राज्यातील चिकनगुनिया रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिकनगुनियाचे रुग्ण चौपट वाढले आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार रुग्ण चौपट वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिकनगुनिया हा रोग ‘एडीस’ जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरतो. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. तसेच जनजागृती देखील केली जाते. मात्र तरी देखील यंदा चिकनगुनिया रोगाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.

राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका हद्दीत १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान चिकनगुनियाच्या ४ हजार १९३ संशयित रुग्णांच्या तपासणीपैकी ९७ रुग्णांमध्ये या आजाराचे निदान झाले. या वर्षी १ जानेवारी २०२४ ते १४ एप्रिल २०२४ दरम्यान राज्यात ५ हजार ८१६ संशयितांपैकी ४०० रुग्णांमध्ये चिकनगुनियाचे निदान झाले. त्यामुळे मागील वर्षीहून हे रुग्ण चारपट वाढलेले दिसत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR