18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरराज्यात विचारधारेची लढाई

राज्यात विचारधारेची लढाई

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दोन विचारधारांमधील लढाई आहे. या निवडणुकीत एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत तर दुस-या बाजूला औरंगजेबाचे समर्थन करणा-यांची टोळी आहे. काही लोक असे आहेत जे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणा-यांना आपला आदर्श मानतात तर आमच्या बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे लोक आहेत.

या जिल्ह्याचे नाव पूर्वी औरंगाबाद होते. या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले जावे, अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केले. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र, ते लोक बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर अवघ्या काही महिन्यांत आम्ही बाळासाहेबांची ती अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण केली, असेही मोदी म्हणाले.

आम्ही या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला तो निर्णय खूप झोंबला. त्यांचे काही सहकारी न्यायालयातही गेले. काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे, असेही मोदी म्हणाले. देशाला गेल्या १० वर्षांपासून ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. मात्र हेच काँग्रेसला खुपत आहे. काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR