22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात सरासरी ९९ टक्के पाऊस?

राज्यात सरासरी ९९ टक्के पाऊस?

पुणे : प्रतिनिधी
यंदा राज्यात सरासरी ९९ टक्के पावसाचा अंदाज असून औगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील असे जेष्ठ कृषी हवामान तज्ञ डों रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीतील पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले ,यंदा राज्यात सरसरीच्या तुलनेत अधिक ५ टक्के पावसाची शक्यता आहे.तसेच र्वा­याचा वेग ,सूर्यप्रकाशाचा कालावधी ,आणि कमी तापमान याचा परिणाम म्हणून जून आणि जुलै महिन्यात धुळे,राहुरी ,अकोला,पाडेगाव ,पुणे, कोल्हापूर, येथे पावसात खंड राजण्याची शक्यता आहे. तसेच दापोली ,नागपुर, निफाड ,सोलापूर, जळगाव परभणी येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ,कमी दिवसात अधिक पाऊस ,आणि काही ठिकाणी पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भ विभागात ९८ टक्के ,पूर्व विदर्भ विभागात १०३ टक्के, मध्य विदर्भ विभागात ९८ टक्के ,मराठवाडा विभागात ९७ टक्के, कोकण विभागात १०६ टक्के उत्तर महाराष्ट्र ९८ टक्के ,पश्चिम महाराष्ट्र ९७ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेली २२ वर्ष पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR