23.8 C
Latur
Monday, August 11, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात सायबर गुन्हेगारी रोखण्याची यंत्रण सक्षम

राज्यात सायबर गुन्हेगारी रोखण्याची यंत्रण सक्षम

नागपूर : प्रतिनिधी
काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी गरुड दृष्टी हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर पोलिस विभागाच्या वतीने पोलिस भवन येथे ‘गरुड दृष्टी’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल १० कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

स्वत:चे विचार मांडण्यासाठी सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणे, धमक्या देणे, हेट स्पीच, फेक न्यूज, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात. त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणा-या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर १९३० व १९४५ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ज्यांची फसवणूक झाली, अशा लोकांचे जवळपास १० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परत देण्यात आले. आज ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले, त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रस्ताविक केले. उपायुक्त लोहित मतानी यांनी कार्यक्रमापूर्वी गरुड दृष्टी बाबत सादरीकरण केले.

फसवणूक रोखण्यासाठी
गरुड दृष्टी विकसित
सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी गरुड दृष्टी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. भविष्यात या टूल्सचा विस्तार आणि क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गरुड दृष्टीची वैशिष्ट्ये
सोशल मीडिया मॉनिटरिंग : गरुड दृष्टी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल मीडियावरील ३० हजार पोस्ट्स तपासण्यात आल्या.
-६५० आक्षेपार्ह पोस्टस्ची नोंद घेऊन त्या संबंधित पोस्ट प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्या.
-सायबर हॅक २०२५ स्पर्धेतून उदयास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आले असून, याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडे आहेत.

-गरुड दृष्टी समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषण, संशयास्पद खाते शोधणे व तात्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR