23.3 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात १३ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

राज्यात १३ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असताना आता १३ वरिष्ठ आयपीएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मनोजकुमार शर्मा यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचसोबत आर. बी. डहाळे यांची राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीतून राज्य गुन्हे अभिलेख केंद्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावर बदली करण्यात आली.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी यशस्वी यादव यांची सायबर सेलच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदावरून पदोन्नती झाली असून त्यांच्याकडे सायबर सेलच्या अपर पोलिस महासंचालकपदाचा पदभार असणार आहे. अशोक मोराळे विशेष पोलिस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग, राजीव जैन, निखील गुप्ता, सुरेश मेखला, सुहास वारके, अश्वती दोर्जे, छेरिंग दोर्जे, के. एम. मल्लिकार्जुन, अभिषेक त्रिमुखे, श्रेणिक लोढा आदींचीही बदली करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR