लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने विधान सभा निवडणूकीची आचार संहिता लागू झाल्यापासून ते दि. ४ नोव्हेंबर अंतर्गत लातूर जिल्हयात अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभाग यांनी संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवून एकूण १०८ गुन्हे नोंद करण्यात आले. यात १३० आरोपींना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदर गुन्हयामध्ये हातभटटी दारु १ हजार ७७६ लि., हातभट्टटी बनविण्याचे रसायन २ हजार २१० लि., देशी ३०९ लि., बियर २९ लिटर, विदेशी ४५ लि. ताडी ५० लिटर मद्य तसेच तीन दुचाकी वाहन मद्य वाहतूक करहीत असताना जप्त करण्यात आले. असा ६ लाख ६२ जार ४३५ रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एस. कोतवाल, आर. एम. चाटे, आर. व्ही. कडवे दुय्यम निरीक्षक एन. पी. रोटे, एस. आर. राठोड, एस. के. वाघमारे, बी. आर. वाघमोडे, व्हि. पी. राठोड, बी. एल. येळे, एस. डी. घुले, एस. पी. काळे, डी. डी. साळवी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, निलेश गुणाले, मंगेश खारकर, षडाक्षरी केंगारे, गजानन होळकर जवान अनिरुध्द देशपांडे, सुरेश काळे, जे. आर. पवार, श्रीकांत साळुंके, एस. व्ही. केंद्रे, कपील गोसावी, विक्रम परळीकर यांनी सहभाग नोंदविला. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात आला असुन अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात विविध पथके नियुक्त केले आहेत, सदर पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत.