लातूर : प्रतिनिधी
६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फे री लातूर व नांदेड केंदांवर संयुक्तपणे पार पडली. या स्पर्धेत लाूतरच्या कलावंतानी सांघिकसह दहा पारितोषीके प्राप्त केल्याबद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विजेत्या कलावंतांचे अभिनंदन केले. राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र लातूरला व्हावे, ही दीर्घकाळापासूनची असलेली कलावंतांची मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पूर्ण करून लातूरला नाट्य स्पर्धा केंद्र मंजूर केले. बहुप्रतिक्षेत असलेल्या या सांस्कृतिक मागणीची पूर्तता झाल्याने लातूरच्या नाट्यवर्तूळात चैतन्य निर्माण झाले असून त्याचा परिपाक म्हणून लातूर केंद्रावर लातूरच्या १२ संघांनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत सूर्योदय, लातूर या संस्थेच्या ‘मुक्ती’ या नाटकास सांंघिक तृतीय पारितोषिक मिळाले असून वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे आहेत. प्रकाशयोजना-द्वितीय जितेंद्र बनसोडे (पुरुष गाळणा-या बायकांचा गाव), रंगभूषा प्रथम सचिन उपाध्ये (नाटक मुक्ती), रंगभूषा द्वितीय प्रतिक्षा पाटवकर (नाटक विठो रखुमाय), अभिनय गुणवत्ता पारितोषिक डॉ. मुकूंद भिसे (द कॉन्शंस), डॉ. सत्यविजय जाधव (बॅरिस्टर), दस्तगीर शेख (संगीत दहन आख्यान), अपर्णा गोवंडे (बॅरिस्टर), डॉ. स्वप्नजा यादव (मुक्ती), प्रतिक्षा पाटवकर (विठो रखुमाय). राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सर्व विजेत्या कलांवतांसोबत सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे अभिनंदन केले असून भविष्यातही नाट्यक्षेत्रात देदिप्यमान कारकीर्द घडविण्याच्या शुभेच्छा त्यांना दिल्या आहेत.