22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराज ठाकरे यांच्या पाठिंब्याने महायुतीला तारले!

राज ठाकरे यांच्या पाठिंब्याने महायुतीला तारले!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
एकीकडे देशभरातील आकडे समोर येत असतानाच महाराष्ट्रातील चित्रही स्पष्ट होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी चांगली कामगिरी केली. त्याचप्रमाणे पुणे आणि सिंधुदुर्गमध्येही महायुतीच्या उमेदवारांनी गड कायम राखल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या या उमेदवारांच्या कामगिरीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही वाटा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला तारले का? अशी चर्चा सुरू आहे.

‘मनसे’ने महायुतीमध्ये सामील व्हावे यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बरेच दिवस प्रयत्न सुरू होते. त्यासंदर्भात राज ठाकरे यांची दिल्लीत अमित शहांशी भेटही झाली. मात्र त्यांची चर्चा निष्फळ ठरली आणि राज ठाकरे यांनी महायुतीत सामील न होता महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. ‘देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. माझं महाराष्ट्र सैनिकांना एकच सांगायचं आहे, की विधानसभेच्या कामाला लागा’, अशी भूमिका राज ठाकरे यांनी जाहीर केली. ‘या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत’, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी युतीला तारले?
राज ठाकरे यांनी राज्यात ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कल्याण डोंबिवली, पुणे आणि सिंधुदुर्ग येथे जाहीर सभा घेतली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही महायुतीच्या उमेदवारासांठी जीवाचे रान करून प्रचार केला होता. आजच्या निकालांमध्ये या तिनही जागांवर महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्रीकांत श्ािंदे, मुरलीधर मोहोळ आणि सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा, बिनशर्त पाठिंब्याचा महायुतीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड आणि खासदार श्रीकांत श्ािंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार प्रत्येक वेळी खासदार म्हणून निवडून येतो. मात्र फुटीनंतर शिवसेनेतच दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध श्ािंदे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. ही लढाई अटीतटीची होईल असा अंदाज दिसत होता, मात्र मतमोजणी सुरू झाल्यापासूनच श्रीकांत श्ािंदे यांनी मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR