29 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeक्रीडाराफेल नदालचे पुनरागमन

राफेल नदालचे पुनरागमन

ब्रिस्बेन : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल टेनिसपटू राफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसेल. रविवारपासून सुरू होत असलेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेद्वारे दिग्गज नदालचा ताकदवान खेळ सर्वांना अनुभवण्यास मिळेल.
त्याचवेळी, जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाकाचेही या स्पर्धेद्वारे पुनरागमन होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमची माजी विजेती ओसाका आई बनल्यानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर परतणार आहे. मागच्या वर्षी गर्भवती असल्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधून तिने माघार घेतली होती.

दुसरीकडे दिग्गज नदालदेखील दुखापतीतून सावरला आहे. ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत याव्यतिरिक्त माटेओ बेरेटिनी, डॉमिनिक थिएम, होल्गर रुन, आर्यना सबालेंका, एलेना रयबाकिना, येलेना ओस्टापेंको, व्हिक्टोरिया अजारेंका, सोफिया केनिन आणि सलोन स्टीफन्स हे दिग्गजही खेळताना दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR